कोल्हापूरात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण : डॉ. कांदबरी बलकवडे (व्हिडिओ)

0
69

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत सरकारने पोलिओ निर्मुलनाचा निर्धार केला आहे. त्यासाठी बालकांना नियमित लसीकरणाव्यतिरिक्त ० ते ५ वर्षापर्यंत बालकांना पोलिओ लसीचे जादा डोस दिले जातात. यानुसार देश पातळीवर गेली २५ वर्षे पल्स पोलिओ कार्यक्रम मोहीम राबविण्यात येते. यंदाच्या याचे २६ वे वर्ष आहे. यावर्षी ४८,६३८ बालकांना ३१ जानेवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मोफत पोलिओ डोस पाजण्यात येणार असल्याचे प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी सांगितले.