टोकियो (वृत्तसंस्था) : पॅरालिम्पिकमध्ये सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. तसेच त्याने एफ- ६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत  नवा विश्वविक्रम केला. याआधी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक पटकावले होते.  सुमितवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगल्या  कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. याआधी अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.  भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण आहे. दरम्यान, रस्त्यावर झालेल्या अपघातात एक पाय गमावलेल्या सुमितचे हे पदक   प्रेरणादायी ठरले  आहे. सुमित हा मूळचा हरयाणाचा आहे.

आमचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये चमकत आहेत! पॅरालिम्पिकमधील सुमित अंतिलच्या विक्रमी कामगिरीचा राष्ट्राला अभिमान आहे. सुमितने प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुला भविष्यासाठी शुभेच्छा, असे ट्वीट मोदी यांनी केले आहे.