बारावी पूर्वपरीक्षेचे पेपर देता न आल्याच्या नैराश्यातून गडहिंग्लजमध्ये युवतीची आत्महत्या

0
2027

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बारावी पूर्वपरीक्षेचे पेपर देता न आल्याच्या नैराश्यातून गडहिंग्लजमध्ये युवतीने घरात स्लबच्या हुकाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मधुजा रामगोंडा पाटील (वय १९) असे तिचे नाव असून हा प्रकार आज (शुक्रवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. गडहिंग्लज पोलिसांत या प्रकाराची नोंद झाली आहे.

गडहिंग्लजमधील धान्य व्यापारी रामगोंडा पाटील यांची मुलगी मधुजा ही साधना महाविद्यालयात बारावीत शिकत होती. सध्या बारावी पूर्वपरीक्षेचे पेपर सुरु आहेत, मात्र काही कारणास्तव तिला हे पेपर देता आले नाहीत. त्यामुळे ती निराश झाली होती. आज दुपारी जेवण झाल्यानंतर ती आपल्या खोलीत गेली. बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या काकांनी खोलीत जाऊन पाहिले असता तिने स्लॅबच्या हुकाला ओढणी बांधून गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे सांगितले. पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.