दिंडनेर्ली (प्रतिनिधी)  :  नंदगाव (ता.करवीर)  येथील सुरेखा दत्तात्रय शेळके (वय ३२) या विवाहितेने स्वतःच्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सुरेखा शेळके हिला एक ९ वर्षाचा मुलगा व ६ वर्षाची मुलगी  आहे. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  पती दत्तात्रय शेळके हे पेंटीगचे काम करतात. तिच्या घरी पती, सासू – सासरे व दोन मुले असा परिवार आहे.  सदर घटनेची इस्पूर्ली पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास  पोलीस करत आहेत.