शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी या गावामध्ये तरुणाने सुमारे पाच-सहा दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. गणेश संभाजी चिवटे (वर्ष २५, रा. माळभाग. जांभळी) असे त्याचे नाव आहे. याची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.

गणेश चिवटे याचे आई-वडील काही वर्षांपूर्वी मयत झाले असून तो एकटाच राहत होता. याच गावात त्य्याची विवाहित बहीण राहते. पाच-सहा दिवसांपूर्वीच गणेश याने घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्यांना त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.  आहे. पोलिसांनी आज (सोमवार) त्वरित धाव घेऊन घरात पाहिले असता चिवटे याचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेह सडल्यामुळे विच्छेदन घटनास्थळीच करण्यात आले. पो. हे. कॉ. सागर पाटील यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. मृत्यूचे कारण अजून समजू शकले नाही.