आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील साई कॉलनी येथे राहणारा अझरुद्दीन अब्दुल अजीज राजगुरू (वय ३३) या तरुणाने राहत्या घरी स्लॅबच्या हुकाला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (मंगळवार) घडला.

अझरुद्दीन याने आत्महत्या सोमवारी रात्री केली असल्याचे घटनास्थळावरील माहितीवरून समजते. सोमवारपासून हा तरुण तणावाखाली होता. हा प्रकार समजताच त्याचा मित्र परिवार, नागरिक साईनगर परिसरात जमा झाले होते. या आत्महत्येची नोंद आजरा पोलिसात झाली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.