बगदादमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट : २० जणांचा मृत्यू

0
68

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकची राजधानी बगदाद पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने  हादरली आहे. बगदादमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात २० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर २८ जण या स्फोटामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बगदाद येथील बाजारात एका व्यक्तीने स्वतःच्या शरीरावर बॉम्ब लावून प्रवेश केला आणि स्फोट घडवून आणला. ही घटना बगदादमधील तायरण चौकात घडली आहे. पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आसल्याची माहिती दिली आहे. स्फोटातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त रीट्रस या वृत्तसंस्थेने दिले आहे.