इचलकरंजीतील बैठकीत कोरोना प्रतिबंधासंबंधी सूचना

0
59

इचलकरंजी (प्रतिनिधी): कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यासह प्रबोधनावर भर देत आवश्यक ती दक्षता घेण्याचा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी ही बैठक आयोजित केली होती.

यावेळी नागरिकांनी कोरोना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही नगराध्यक्षा स्वामी यांनी केले आहे.
बैठकीस मुख्याधिकारी शरद पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, अशोक स्वामी, नगरसेवक सागर चाळके, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, विठ्ठल चोपडे, किसन शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, अजित जाधव, संजय बागडे, विश्‍वास हेगडे, डॉ. महेश महाडिक ,सी. डी. पोवार, विजय पाटील, महादेव गोरडे उपस्थित होते.