कोल्हापुरात ट्रान्सफॉर्मरला अचानक आग : वाहनधारकांसह पादचाऱ्यांची तारांबळ

0
57

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानाशेजारी असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला आज (शुक्रवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली. ट्रान्सफॉर्मरने झटपट पेट घेतल्याने त्याशेजारी असणाऱ्या टपरीधारकांची तसेच पादचाऱ्यांसह वाहनधारकांची एकच त्रेधातिरपीट उडाली. वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असली तरी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. समोरच पेट्रोल पंप असल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. यामुळे अनुचित प्रसंग घडला नाही.