गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुका प्रशासनाने आज सकाळी दीडशेहून अधिक नागरिकांची अचानक कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. या अचानक चाचणीमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

आज (गुरुवार) गारगोटी येथे क्रांतीज्योतीसमोर अचानक कोविड चाचणी केंद्राची रुग्णवाहिका उभी राहिली.  त्यातून पीपीई किट घातलेले वैद्यकीय कर्मचारी उतरले. प्रशासनाच्या सहाय्याने त्यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणारे लोक, हातगाडी, किरकोळ व्यापार करणारे, दुकानदार, ग्राहक यांची अँटिजेन चाचणी केली. सकाळी दहापासून दुपारपर्यंत सुमारे दीडशे जणांची तपासणी करणेत आली. त्यामध्ये नांगरगाव येथील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. ही मोहीम चालू केल्यानंतर रस्त्यावरील गर्दी आपोआप कमी झाली. या अचानक तपासणी मोहिमेची चर्चा शहर व तालुक्यात रंगली.

या मोहिमेत मंडल अधिकारी आर. एम. लांब, तलाठी राजन शिंदे, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय पथकांनी भाग घेतला.