सावर्डेतील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा असा प्रामाणिकपणा…

0
195

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील विद्यार्थ्यांनी हर्षदा पाटीलने रस्त्यात सापडलेली सुमारे सव्वीस हजारांची सोन्याची चेन प्रामाणिकपणे परत केली. याबद्दल हर्षदाचा शालेय साहित्य देऊन तिचा सत्कार करण्यात आला.

पूनम बच्चे या शनिवारी आपल्या पहिल्या इयेत्तेत शिकणाऱ्या मुलीला विद्यामंदिरामध्ये सोडण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांची सोन्याची चेन विद्यामंदिराच्या प्रांगणात हरवली होती. त्यावेळी इयत्ता ४ थीमध्ये शिकणारी विद्यार्थ्यांनी हर्षदा पाटीलला सोन्याची चेन सापडली. तिने आपल्या वर्गशिक्षिकांच्याकडे आणून दिली. त्यानंतर या चेनची शहानिशा करता ही चेन बच्चे यांची आढळून आली. यावेळी मुख्याध्यापक डी. बी. पाटील यांनी ओळख पटवून ही चेन पूनम यांना परत दिली.

याबदद्ल हर्षदा पाटीलचा पूनम बच्चे यांनी शालेय साहित्य देऊन सत्कार केला. तसेच तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.