यशस्वी विद्यार्थ्यांचा बळीराजा अकॅडमीमध्ये सत्कार

0
130

गारगोटी (प्रतिनिधी) : सरकारी नोकरी हे प्रत्येकाचे स्वप्न असते; पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन व चिकाटीची गरज असते. या सर्व बाबी फक्त बळीराजा अकॅडमीमध्ये पूर्णत्वास जातात. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करुन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केले.

गंगापूर, ता. भुदरगड येथे शासकीय सेवेतील विविध पदांवर नियुक्ती झालेल्या विविध मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन संभाजी कल्याणकर होते. प्राचार्य आबिटकर म्हणाले, जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या विविध भागातून आलेली जवळपास ६०४ हून मुले-मुली अगदी हमखास स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत गेली आहेत, ही खरोखरच कौतुकास्पद व गौरवशाली परंपरा आहे.

पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, प्रमोद चव्हाण, अंकिता पाटील, रमाकांत ननावरे यांची भाषणे झाली. यावेळी सरपंच सीमा कांबळे, सयाजी पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष अजित जाधव यांचे वडील अमृत जाधव यांचा फादर्स डेनिमित्त हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.