इचलकरंजी :  यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकच्या विद्यार्थ्यांनी विविध विभागीय स्तरावरील क्रीडा प्रकारात यश मिळवले आहे.

गारगोटी येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकने अजिंक्यपद मिळवले. त्यामध्ये निशांत मगदूम, वरद पाटील, कार्तिक रुपनूर, सौरभ कुंभार, पृथ्वीराज घुणके, मयूरेश तोरस्कर, श्रीराम कांबळे, राहुल पुजारी, गणेश ततगुंटी, सार्थक पुजारी, सुजल पाटील सहभागी होते.

शिरोळ येथे झालेल्या वेटलिफ्टींग स्पर्धेत नितीश पाटील (१०५ किलो), वीराज खुतळे (९४ किलो) यांनी सुवर्णपदक मिळविले. तळसंदे येथे झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत स्वप्नील बुडके, करण दबडे, हर्षवर्धन पाटील, ओंकार सवायराम, प्रज्वल पाटील यांनी रौप्य पदक पटकाविले. गारगोटी येथे झालेल्या अॅथलेटिक स्पर्धेत चारशे मीटर रिलेमध्ये ऋत्विक चंदोबा, प्रणव शिरपुरे, आदित्य चौगुले, विशाल कांबळे यांनी रौप्यपदक पटकावले. वारणानगर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत स्वप्नील पाटील (७० किलो गटात) याने रौप्यपदक मिळविले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य बी. एस. ताशीलदार, विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.