नागाव येथील कबड्डी स्पर्धेत कौलवच्या शिवमुद्रा संघाचे यश…

0
66

टोप (प्रतिनिधी) : ग्नॅट फाऊंड्री व अॅवलॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कौलवच्या शिवमुद्रा संघाने अजिंक्यपद मिळवले. पुलाची शिरोली येथील छावा संघाशी समान गुण झाल्याने रेटिंगमध्ये पंच समितीने साधना संघास प्रथम क्रमांक दिला.

साधना आणि छावा यांच्यात अतीशय अटीतटीचा सामना झाला. समान गुणात समाना झाल्याने पंच समितीने आणखी दोन मिनिटाचा सामना खेळवण्याचा निर्णय दिला. मात्र, छावा संघाने आपली असमर्थता दर्शवत दुसरा क्रमांक स्विकारला. उपांत्य फेरीतील साधना (म्हलसवडे)  आणि साधना (कोल्हापूर) या दोन्ही पराभूत संघांना तिसर्‍या क्रमांकासाठीचे पारितोषिक विभागून देण्यात आले. विजेत्या संघाला अनुक्रमे अकरा हजार, सात हजार व पाच हजार रूपये रोख व चषक असे बक्षीस देण्यात आले. तसेच आदर्श संघ म्हणून यजमान सिध्दार्थ (नागांव), सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वप्निल सुर्यवंशी (छावा), उत्कृष्ट चढाई मनिष सिंग (सिध्दार्थ), उत्कृष्ट पकड विनायक शिंदे (शिवमुद्रा) अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

यावेळी बिना जानवडकर, आशा जैन, स्मॅक अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, राजू पाटील, सपोनि. सागर पाटील उपस्थित होते.