ग्रामपंचायती निवडणूकीत भाजप कार्यकर्त्यांचे यश कौतुकास्पद : समरजितसिंह घाटगे

0
154

आजरा (प्रतिनिधी) : सत्ता नसताना एकटे लढूनही भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या परिश्रमातून जिल्ह्यात ग्रामपंचायतीमध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले. ते आजरा येथे बुथ संपर्क अभियान, नूतन सरपंच आणि उमेदवारांच्या सत्कारावेळी आज (गुरुवार) बोलत होते.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, राज्यात  सत्तेवर असो वा नसो कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा. जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या कामाला प्राधान्य द्यावे. गट-तट न बघता निवडणुकीत मतदान केले की नाही केले, याचा विचार न करता कामे करावीत. जनता तुमच्या कामाचे मूल्यमापन योग्य वेळी  केल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा ज्योत्सना चराटी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, संघटन मंत्री नाथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, जिल्हा उपाध्यक्ष राहूल देसाई, उप सभापती वर्षा बागडी, जि.प.सदस्या सुनीता रेडेकर, नगरसेविका शुभदा जोशी, अनिरुद्ध केसरकर, आनंदा कुंभार, महिला आघाडी मोर्चा अध्यक्ष नयन भुसारी, नाथ देसाई आदी उपस्थित होते.