टप्पा अनुदानित शाळांसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद : आ. जयंत आसगावकर

0
110

मुंबई (प्रतिनिधी) : वीस व चाळीस टक्के टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांच्या वेतन अनुदान वितरणाची पुरवणी यादी बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. लवकरच या बाबतचा आदेश निघणार आहे, अशी माहिती पुणे विभाग शिक्षक आ. जयंत आसगावकर यांनी दिली.

आ. आसगावकर म्हणाले की, ही प्रक्रिया यापूर्वीच होणे गरजेची होती, तरी देखील शिक्षकांना या तरतुदीमुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. भविष्यामध्ये आपण प्रचलित पद्धतीचा आदेश काढण्यासाठी आग्रही राहणार आहोत. तसेच अघोषिताच्या याद्या लवकरात लवकर घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.

कोल्हापूर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या टप्पा अनुदानाचा निधी वितरणाचा आदेश एकत्रितच निघणार आहे. या पूरक मागण्यांमध्ये जरी त्याचा उल्लेख नसला तरी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा आदेश काढताना या संस्था एकत्र घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शिक्षकांनी याबाबत चिंता करू नये, असे आवाहनही आ. आसगावकर यांनी केले आहे.