वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात…

0
292

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी लाचेची मागणी करुन पाच हजार रुपयांची लाच घेताना वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत श्रीपती भोसले रा. (प्लॉट नं. ३०,भोसलेवाडी, कोल्हापूर) याला वडगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरुवार) अटक केली आहे.

तक्रारदार यांच्या पक्षकारावर वडगाव पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक भोसले याने ५ हजारांची लाच  मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी वडगाव येथे सापळा लावून भोसले याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याला अटक केली आहे.

ही कारवाई, सहाय्यक फौजदार बबंरगेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद पोरे,  पोलीस नाईक नवनाथ कदम,  सुनिल घोसाळकर यांच्या पथकाने केली.