टोपमधील अभ्यासिका युवकांना उपयुक्त ठरेल : तानाजी पाटील

0
316

टोप (प्रतिनिधी) : एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षेसह विविध शासकीय पदे मिळवण्यासाठी गावातील युवकांसाठी टोप ग्रामपंचायतमार्फत अभ्यासिका सुरु केली आहे. ही अभ्यासिका गावातील युवकांना उपयुक्त ठरणार असून, यामुळे चांगली संधी उपलब्ध झाली असल्याचे मत सरपंच तानाजी पाटील यांनी व्यक्त केले. अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत इमारतीत सुसज्ज अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे.

श्रीपती पाटील म्हणाले, निवडणुकीपूर्वीची वचनपूर्ती सरपंच तानाजी पाटील यांनी पूर्ण केली आहे. या अभ्यासिकेचा अनेक विद्यार्थांना फायदा होणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थी घडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नेते पिलाजी पाटील म्हणाले, गावातील विद्यार्थांनी याचा फायदा घेऊन आपले उज्ज्वल भविष्य मोठे करावे व आई-वडिलांना अभिमान वाटेल, असे यश संपादन करावे.

यावेळी उपसरपंच बापू पोवार, मानसिंग गायकवाड, बाळासो चव्हाण, विठ्ठल पाटील, नंदकुमार मिरजकर, बाळासो कोळी, प्रकाश पाटील, दिलीप मुळीळ, रमेश पाटील, सविता कुरणे, ग्रामविकास अधिकारी डी. आर. देवकाते आणि ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.