मुंबई (प्रतिनिधी) : बीई अणि बी-टेक  सह इतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मेन्स२०२३ च्या नोटिफिकेशनची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत.

जेईई मेन्स २०२३ अधिसूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सी जारी करणार आहे. हे NTA च्या वेबसाइट nta.ac.in आणि JEE Main च्या वेबसाइट jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल. अहवालानुसार, जेईई मुख्य अधिसूचना या आठवड्यात जारी केली जाईल. परीक्षेचे पहिले सत्र जानेवारी २०२३ मध्ये होणार आहे. यावेळीही जेईई मेनची परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जेईई मेन २०२३ सत्र एक परीक्षा जानेवारीमध्ये आणि सत्र दोनची परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये होईल. पहिल्या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज डिसेंबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात करता येतील.