पेठ वडगांव (प्रतिनिधी) : जीवनामध्ये खूपच महत्वाची असतात. मुल्यशिक्षणातून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, सदाचार ह्या गुणांचा मुलांनी स्वीकार करावा. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपला सर्वांगीण विकास करावा. असे प्रतिपादन राजयोगिनी सुनीता बहनजीं यांनी केले. त्या पूनावाला स्कूल आयोजित म. गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन माध्यमातून बोलत होत्या.

सुनिता बहनजी म्हणाल्या की, थोर नेत्यांचे विचार हे खूप महान आहेत. त्यामुळे ते आपले आदर्श आहेत. मूल्यांतून आपली विशेष ओळख होत असते. म.गांधीजीं आणि लाल बहादूरशास्त्री यांचे विचार आपण आत्मसात करून विकास साधण्याचा मौलिक उपदेशही त्यांनी दिला.

तसेच महात्मा गांधीजी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित चित्रफित आणि पीपीटी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. तसेच गांधीजी सप्ताहामध्ये प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, निबंधलेखन, काव्यगायन, काव्यवाचन, स्वच्छता अभियान सारखे विविध उपक्रम घेण्यात आले.

या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, स्कूलच्या अध्यक्षा विद्या पोळ संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्य मारुती कामत, विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.