गडहिंग्लज पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार वादावादी

0
771

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज पालिकेची सर्वसाधरण सभा शाहु सभागृहात पार पडली. या सभेसाठी विषय पत्रिकेत एकूण २५ विषय होते. पण विषय पत्रिकेतील क्र. २० चा विषयावर नगरसेवक बसवराज खनगावे यांनी पोतदार कॉलनी येथे खाटीक समाजाला सांस्कृतिक हॉल बांधून देणे बाबत मांडला होता. यावेळी विरोधी नगरसेवक दीपक कुराडे आणि नरेंद्र भद्रापुर यांच्यात जोरदार वादावादी झाली.

यावेळी दिपक कुराडे म्हणाले की, या ठिकाणी हॉल बांधण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध असून तेथील स्थानिकांच्या बरोबर चर्चा करून मगच निर्णय घ्यावा. या प्रश्नावर उत्तर देताना नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज शहर हे पुरोगामी असून इथे जर जाती-पातीच राजकारण केलं जातं असेल तर चुकीचं आहे. ही जागा जर मी या समाजाला देऊ शकले नाही तर स्वतःला नगराध्यक्ष म्हणून घेण्यास लायक राहणार नाही.

तर नगरसेवक नरेंद्र भद्रापुर, शशिकला पाटील, वीणा कापसे  यांनी सुद्धा या चर्चेत भाग घेतला. हा विषय नगराध्यक्षांनी बहुमताने मंजूर करून घेतला.