कोल्हापुरात कौशल्य अभ्यासक्रमासाठी प्रयत्नशील: आ. ऋतुराज पाटील

0
15

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकीकडे बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी तरूण मनुष्यबळाला कौशल्य विकासाचे बळ देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ. ऋतुराज पाटील यांनी केले.

आधुनिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणाऱ्या बेळगाव येथील गव्हर्मेंट टूल्स अँड ट्रेनिंग सेंटरला (जीटीटीसी) जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यासोबत आ. पाटील यांनी भेट दिली,

‘मिशन रोजगार’च्या माध्यमातून कोल्हापुरातील युवक-युवतींना सध्याच्या कंपन्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण कोल्हापूरमध्येच उपलब्ध करून त्यांना रोजगारक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बेळगामधील अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये लवकर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे आ पाटील यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षण मिळावे, नवे अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत असा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव येथील जीटीटीसीला भेट  देऊन देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली.

यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्रा. मकरंद काइंगडे, तेजस दुणाखे, आयटीआयचे भिंगारदिवे, गोशिमाचे सावंत, शशांक मोरे, राजन डांगरे  आदी उपस्थित होते.