हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळतेमध्ये आज (शुक्रवार) कोरोना दक्षता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आळतेमध्ये पाच दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, गावात २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी एकाच मृत्यू झाला आहे. तर १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या बंदमध्ये दूध तसेच मेडिकल्स, दवाखाने सुरु राहणार आहेत. तर इतर व्यवसाय बंद राहणार आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन हातकणंगले पं.स. उपसभापती प्रविण जनगोंडा यांनी केले.

यावेळी ग्रामसेवक फोलाणे, पोलीस पाटील रियाज मुजावर, दक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.