कोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…

0
170

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी पोलीस ठाणे ५ आणि राजारामपूरी पोलीस ठाणे येथे १ वर गुन्हा असे एकूण २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यांवर ३२ गुन्हे दाखल करून ४४ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून ८ लाख ९२ हजार ३४८ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. र आज (शनिवार) चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या एकूण ४५४ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७७ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच मोटर वाहन कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या एकूण १९७० जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून एकूण ३ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची २६३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.