रांगोळीमध्ये पूरग्रस्त भागांचे काटेकोरपणे पंचनामे सुरु…

0
342

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळीमध्ये २०१९ च्या महापुरातील पूरग्रस्त यादीतील घोळ आणि अनुदान वाटप यावरून प्रचंड गदारोळ झाला होता.  या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यावर्षी अधिकाऱ्यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी करून अत्यंत काटेकोरपणे पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.

पूर ओसरण्यापूर्वी तलाठी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पूराच्या पाण्यात जाऊन पूरग्रस्त भागांचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग केल्यामुळे त्यांना पंचनामा करण्यास सोयीचे ठरत आहे. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले आहे, त्याच लोकांच्या घराचा पंचनामा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे पंचनामे तलाठी सत्तार गवंडी, ग्रामसेवक कुमार वजिंरे, लिपीक अंकुश रोडे, राहुल भुयेकर करीत आहेत.