‘या’ निवडणूकांसाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी : शैलेश बलकवडे

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका सुरळीत पार पडण्यासाठी कायदा सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. असे आदेश पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी आज (बुधवार) क्राईम आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

बलकवडे म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक एक डिसेंबर रोजी होत आहे तसेच निवडणूकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका सुरळीत पार पडाव्यात. कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा येऊ नये यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना पोलिस अधिकक्षकांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच हद्दपारीची कारवाईही करावी. कोल्हापूर शहरात दिवसासह रात्रीच्या गस्तीमध्येही वाढ करावी, असेही ते म्हणाले.