गिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…

0
415

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीने ९ मे ते १६ मे पर्यंत असा आठ दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आहे.

यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे ग्रामपंचयात आणि पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.