पन्हाळा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पन्हाळा, करवीर, शिरोळ, हातकणंगले या चार तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या चार तालुक्यांनी रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश काल (मंगळवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते. त्यानुसार आज (बुधवार) उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सक्त सूचना देऊन शासकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली.

या बैठकीत गृहअलगीकरण न करणे, रुग्ण संपर्क शोध मोहीम, लसीकरण व सर्व माहिती अद्ययावत ठेवणे यावर भर देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी अनिल कवठेकर यांनी सध्या कोरोना ४८५ रुग्ण सक्रीय ४८५ असल्याचे सांगितले. सध्या सक्रिय रुग्ण संजीवन व पोर्ले येथे ठेवले असुन या ठिकाणी ऑक्सिजन सह औषधांची चांगली सोय ठेवली असून रुग्णांच्या पहिल्या संपर्कातील लोकांना त्यांचे घरीच ठेवले असल्याचे सांगितले. ही रुग्ण संख्या कमी करण्याचे दृष्टीने प्रयन्त सुरु असल्याचे डॉ. कवठेकर यांनी सांगीतले