पथविक्रेत्यांनी कर्जासाठी तात्काळ अर्ज करावा : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व्हेक्षण झालेल्या आणि सर्व्हेक्षणापासून वंचित असलेल्या पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्जासाठी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यानी केले. ते पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या अंमलबजावणीचा आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी निवडणूक कार्यालयात आढावा घेतला, त्यावेळी बोलत होते.

यावेळी डॉ. कलशेट्टी म्हणाले की, ज्या पथविक्रेत्यांचा सर्व्हे झाला नाही, त्यांनी Apply for LOR येथे ऑनलाईन अर्ज करुन शिफारसपत्राची मागणी करावी, शिफारसपत्र मिळाल्यानंतर https://pmsvanidhi. mohua.gov.in या वेबसाईटव्दारे ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज करावा. जेणेकरुन शहरातील एकही पथविक्रेता या योजनेपासूनवंचित राहणार नाही, असेही आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले. आतापर्यंत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत विविध बँकांच्यवतीने ८४४ पथविक्रेत्यांची कर्जप्रकरणे मंजुर करुन त्यांना ८४लाख ४० हजाराचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.या योजनेंतर्गत महानगरपालिकेस ६ हजार ६०० कर्जप्रकरणांचे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी अधिकाधिक कर्जप्रकरणे करावीत. ही योजना महापालिका क्षेत्रात व्यापक स्वरुपात राबवून कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अग्रेसर ठेवावी, असे आवाहनही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी केले.

यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे सामाजिक विकास व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर, निवास कोळी, स्वाती शहा आणि अंजली सौदलगेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Live Marathi News

Recent Posts

…तर शरद पवारांच्या घरावर मोर्चा ! – मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून…

3 hours ago

जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत पुन्हा वाढली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत…

3 hours ago

कळे येथील शिबिरात १४० जणांचे रक्तदान

कळे (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ जानेवारी…

3 hours ago