तारदाळमध्ये भरदिवसा पथदिवे सुरूच : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

0
129

शिरोळ (प्रतिनिधी) : संगमनगर, तारदाळ येथील बहुतांश ठिकाणी भरदिवसा पथदिवे सुरूच राहात असून तारदाळ ग्रामपंचायतीने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. मागील सलग दोन दिवसांपासून पथदिवे दिवसा सुरूच राहिले आहेत.

एकिकङे पथदिवे दिवसा चालू राहतात तर दुसरीकडे भारनियमामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. या गोष्टीचे योग्य नियोजन केले तर नागरिकांना त्रास होणार नाही. परंतु या पथदिव्याचे बिल कोणाच्या माथी पडत आहे, हा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.