यड्रावमधील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा : ग्रामस्थांची मागणी

0
120

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्रावमध्ये बरेच दिवस झाले भटक्या श्वानांनी धुमाकूळ घातला आहे. ही श्वाने लहान मुले तसेच वयस्कर नागरिकांच्या अंगावर येऊन चावा घेण्याचं प्रयत्न करतात. यामध्ये गावातील पाळीव प्राण्यांना देखील त्यांनी चावा घेतला आहे.

यासाठी गावातील ग्रामस्थांनी या भटक्या श्वानांचा कायमचा बंदोबस्त करावा,  असे निवेदन यड्रावचे ग्रामविकास अधिकारी गावडे देण्यात आले. यावेळी गावडे यांनी यावर लवकरच कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. या निवेदनावर संदीप यादव, श्रीपाद शिवूडकर, गोरख मोहिते, पुरंदर मगदूम, सर्जेराव कांबळे, ओंकार सावेकर यांच्यासह गावातील नागरिकांच्या सह्या आहेत.