शिरोळ तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच : आणखी एकजण गंभीर

0
47

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यात भटक्या कुत्र्यांकडून पाळीव जनावरे, माणसांवर हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. काल नवे दानवाड येथील वृद्धाचा कुत्र्यांनी बळी घेतला होता. काल रात्रीच कुत्र्यांनी एका पाळीव जनावरावर हल्ला करून त्याला जखमी केले. हे कमी म्हणून की काय, कुत्र्यांनी आज नवे दानवाड येथील बंडू अपराध या मध्यमवयीन व्यक्तीवर हल्ला चढवला, त्याला ठिकठिकाणी चावे घेऊन गंभीर जखमी केले आहे. नशीब बलवत्तर म्हणूनच तो बचावला. त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र कुत्र्यांच्या या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.