कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांची ‘जगदंबा’ तलवार इंग्लंडमध्ये राणीच्या खासगी संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. ही तलवार भारतात आणण्याकामी राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवदूर्ग संवर्धन आंदोलन संघटनेच्या वतीने शनिवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता तावडे हॉटेल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवभक्त हर्षल सुर्वे यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत दिली.

 

हर्षल सुर्वे म्हणाले की, छ. शिवाजी महाराज यांची ‘जगदंबा’ तलवार इंग्लंडमध्ये राणीच्या खासगी संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. याबाबतचा पुरावा सन १८७५-७६ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीनंतर तयार झालेल्या कॅटलॉगमध्ये निदर्शनास आला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने छत्रपतींची तलवार भारतात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. या मागणीबाबत राज्य व केंद्र सरकारला इमेलद्वारे पत्र्यव्यवहार सुरू करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला मोडी संशोधक अमित आडसुळे, शिवदूर्ग संवर्धन आंदोलन संघटनेचे पदाधिकारी, शिवभक्त आदी उपस्थित होते.