इचलकरंजी येथे महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको…

0
323

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील मंगळवार पेठ परिसरात नियमित पाणी पुरवठा होत नाही. याच्या निषेधार्थ परिसरातील महिलांनी नगरपालिकेच्या विरोधात आज (बुधवारी) सकाळी गांधी पुतळा येथे रास्ता रोको केला.

आंदोलनास्थळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक राहुल खंजिरे, नगरसेविका ध्रुवती दलवाई, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी भेट दिली.  महिलांनी आंदोलन मागे घ्यावे, पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले. पण महिलांचे यावर समाधान झाले नाही. महिला अधिक आक्रमक झाल्या. येत्या ८ दिवसांत सुरळीत पाणी पुरवठा झाला नाहीतर उग्र आंदोलन करू, असा इशारा महिलांनी दिला.

यावर पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी येत्या ८ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात मंगळवार पेठ परिसरातील अनेक महिलांनी सहभाग घेतला होता.