शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद

0
7

मुंबई : आज भारतीय शेअर बाजारासाठीचा दिवस चांगला ठरला. बुधवारी बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजार आज वधारला.

आज दिवसभरातील शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३४६ अंकांच्या तेजीसह  ५७,९६० अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२९ अंकांच्या तेजीसह १७,०८० अंकांवर स्थिरावला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू अशा सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली. फक्त ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील स्टॉकसमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. निफ्टी ५० मधील फक्त ६ कंपन्यांचे शेअर दर घसरणीसह बंद झाले. ४४ कंपन्यांचे शेअर दर वधारले. सेन्सेक्स ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे शेअर दर तेजीसह बंद झाले. फक्त ४ कंपन्यांचे शेअर दर घसरले.