ओबीसी-व्हिजेएनटी प्रवर्गाच्या मागण्यांबाबत गगनबावडा तहसिलदारांना निवेदन

0
64

साळवण (संभाजी सुतार) : ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास जातींचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ओबीसी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अनेकवेळा मंत्रीमंडळांच्या बैठकाही झाल्या. त्याच बैठकीत ओबीसी प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. त्याचसंदर्भात आज (मंगळवार) गगनबावडा ओबीसी आरक्षण बचाव समितीतर्फे तहसिलदार सगंमेश कोडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी, ‘थांबलेल्या प्रवेश प्रक्रिया सुरू करा, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के फ्री शिप द्या, बलुतेदारांना स्वतंत्र आरक्षण द्या,’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. निवेदनात म्हटले आहे की, ओबीसींचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

गगनबावडा तहसिलदारांना निवेदन देताना गगनबावडा ओबीसी आरक्षण बचाव समितीने एकून १७ मागण्या केल्या आहेत. यावेळी नाभिक समाजाचे नेते सखाराम मोहिते, सुतार समाजाचे नेते संजय सुतार, सागर भोसले, शकंर सुतार, सुरज सुतार, बाबासो सुतार, संभाजी भोसले, मंगेश सुतार, संतोष सुतार आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.