gad

ताज्या बातम्या

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज (मंगळवारी) मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. हा पुरस्कार नव्या स्वरुपात,...

आसाराम बापूला आणखी एका बलात्कार प्रकरणात जन्मठेप

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : स्वयंघोषित संत आसाराम बापूला आणखी एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००१-०६ या पाच वर्षांच्या कालावधीत आसारामच्या आश्रमात असलेल्या दोन बहिणींवर आसारामने सातत्याने बलात्कार केला होता. याप्रकरणी २०१३ मध्ये...

सिद्धगिरी मठास श्री श्री रवीशंकर यांची सदिच्छा भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध कलाविष्कारातून आणि आत्मसंवादातून जीवनाचा सहज सोपा मार्ग दाखवणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री. श्री. रवीशंकर आणि अध्यात्माला विविध सेवा कार्याची आणि शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या प्रयोगशील प्रबोधन उपक्रमाची जोड देत प्रयोगशीलपणे कार्यरत...

एप्रिलपासून ९ लाख सरकारी गाड्या जाणार स्क्रॅपला

दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १ एप्रिलनंतर १५ वर्षांपेक्षा जुन्या नऊ लाख सरकारी वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी नवीन वाहने आणली जाणार आहेत. ही वाहने केंद्र आणि राज्य सरकारे, परिवहन महामंडळे...

अर्थसंकल्पाच्या अपेक्षेने शेअर बाजारात तेजी

मुंबई : आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले. गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी, आर्थिक सर्वेक्षणातील काही सकारात्मक बाबी, विकासदराचा अंदाज आणि चांगल्या अर्थसंकल्पाच्या अपेक्षेनेही बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग सेक्टरमध्ये शेअर बाजारातील...