गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेले आठ महिने बंद असणाऱ्या शाळा, महाविद्यालये आता सुरू झाली आहेत. गडहिंग्लज हे शैक्षणीक केंद्र असून अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. पण गडहिंग्लज आगराने अजूनही ग्रामीण भागात पुरेश्या बस फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. तरी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून येथील गडहिंग्लज आगार प्रमुखांनी ग्रामीण भागात बस फेऱ्या वाढवाव्यात, अशा मागणीचे निवेदन न्यू युवा मंचच्या वतीने आगार प्रमुखाना देण्यात आले. या निवेदनावर काशिनाथ गडकरी,हल्लप्पा भमानगोळ,निकेतन चव्हाण,प्रकाश पाटील आदींच्या सह्या आहेत.
ताज्या बातम्या
कोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार
दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...
नाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू
मुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...
”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...
केंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम
नवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...
मध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....