हाथरस प्रकरणी राधानगरी तालुका चर्मकार संघटनेचे तहसिलदारांना निवेदन…

0
60

धामोड (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामुहिक अत्याचारी पिडीत तरुणी मनिषा वाल्मिकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. यातील आरोपींना फाशी व्हावी, असे निवेदन राधानगरी तालुका चर्मकार संघटनेने तहसिलदारांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, हाथरस प्रकरणाची दखल घेऊन योगी सरकारने अत्याचारी आरोपींना थेट फासावर लटकावे. अन्यथा चर्मकार विकास संघ तालुक्यात तिव्र आंदोलन छेडेल. याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल. या आशयाचे निवेदन राधानगरी तहसीलदारांना राधानगरी तालुका चर्मकार संघटनेच्या वतीने देण्यात आले.

यावेळी राधानगरी तालुका संत रोहिदास सेवाभावी संस्था अध्यक्ष आनंदा चव्हाण, राशीवडे सरपंच कृष्णात पोवार, खेंडी व्हरवडे पोलिस पाटील राजाराम पोवार, मनसेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,पांडुरंग पोवार, दिगंबर चव्हाण, दत्तात्रय पोवार, दिपक चव्हाण, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here