धामोड (प्रतिनिधी) : तुळशी-धामणी परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना वेळेवर एसटी नसल्याने त्यांची पायपीट होत होती. तसेच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. त्यामुळे लाईव्ह मराठीने याविषयी आवाज उठवला होता. याची दखल घेत राधानगरी पं. स. सभापती वंदना हळदे यांनी राधानगरी एसटी आगारप्रमुख सागर पाटील यांना भोगावती ते म्हासुर्ली बससेवा सुरु करण्यासाठी निवेदन दिले.

यावेळी आगारप्रमुख पाटील यांनी येत्या चार दिवसात विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन वेळेचा विचार करून आणखीन दोन गाड्या सोडणार  असल्याचे सभापती हळदे यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले. यावेळी विलास हळदे उपस्थित होते.