माणुसकी फौंडेशनचे नगराध्यक्षांना निवेदन…

0
102

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील शिवतिर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शिवतीर्थावर शिडीची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी माणुसकी फौंडेशनच्यावतीने आज (मंगळवार) करण्यात आली. या मागणीचे निवेदन नगराध्यक्षा अलका स्वामी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शिवजयंतीच्या निमित्ताने इचलकरंजी आणि परिसरातील अनेक शिवभक्त शिवतीर्थवरुन ज्योत नेण्यासाठी येत असतात. मात्र, सध्या शिवतीर्थाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. माणुसकी फौंडेशनच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा स्वामी यांची भेट घेऊन छ. शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम त्वरीत पूर्ण करावे. तिथे येणार्‍या शिवभक्तांसाठी शिवतीर्थवर शिडीची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षा स्वामी यांनी सुशोभिकरणासह शिडीची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले.

यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे, प्रविण केर्ले, बंडा पाटील, आकाश नरुटे, आनंदा इंगवले, धनंजय शेवाळे, संजय शहापुरे, प्रविण जाधव उपस्थित होते.