गगनबावडा गटविकास अधिकाऱ्यांना संगणक परिचालकांचे निवेदन…

0
163

साळवण (प्रतिनिधी) :  ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या संगणक परिचलकांना १० वर्षे काम करूनही फक्त १००० रुपये मानधन वाढ करण्याच्या शासन निर्णय बाबत राज्यभर आज निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी गगनबावडा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी शरद भोसले यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्‍या संगणक परिचलक यांना न्याय देवून भ्रष्टाचार करणार्‍या कंपनीला पुन्हा शासनाने  काम देवू नये. यासह विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी टोणपे उपस्थित होते.यावेळी गगनबावडा तालुकाध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष विनायक पाटील, संदीप वरेकर, दिलीप कांबळे, महादेव जाधव, इंद्रजीत पारगावकर, विश्वनाथ माने, संदीप कदम, रमेश कोकणे यांच्यासह गगनबावडा तालुक्यातील संगणक परिचलक उपस्थित होते.