कोल्हापूर (प्रतिनिधी) : कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक फिलिप्स कंपनीचे अँझोरिअन कॅथलॅब मशीनचे पूजन प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले.

समाजातील सर्वच गोरगरिब लोकांना त्यांच्या आजारावरील उपचार योग्य आणि कमी खर्चात इलाज व्हावेत, कमी खर्चात उपचार होत असले तरी ती उपचार पद्धती गुणवत्तेची केली जावी, यासाठी ‘निराधारांना आधार’ ह्या तत्वाचा उद्देशसमोर ठेवून काडसिद्धेश्वर स्वामी यांनी विविध आणि आधुनिक उपकरणांची उपलबद्धता सिद्धगिरी आरोग्यधाम येथे करण्यात आली आहे. १५० पेक्षा अधिक बेडचे अॅलोपॅथी हॉस्पिटल, हायटेक मशीनप्रणाली, आधुनिक पद्धतीचे २४ तास सेवा देण्यासाठी अतिदक्षता विभाग (आयसीयू) उपलब्ध आहे.

फिलिप्स कंपनीचे अँझोरिअन मोस्ट-एडव्हान्स फीचर्स मशीनप्रणाली सिद्दगिरीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. अँझोरिअन तंत्रज्ञान मशीन हे अन्जिओग्राफी, अन्जिओप्लास्टी तसेच अँन्युरिजम असेल अशा कोणत्याही प्रकारची दुविधा रक्तवाहिनीमध्ये आढळली तर अँझोरिअन तंत्रज्ञानाच्या आधारे दुरुस्ती करून उपचार करता येऊ शकतात. फक्त मेंदू आणि हृदयातीलतील रक्तवाहिन्या नव्हे तर शरीरात असणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये जसे की, हात, पाय, पोट, मेंदू, हृदयामध्ये असणाऱ्या ६४००० इतक्या रक्तवाहिनीमधील तपासणी आणि उपचार अँझोरियन तंत्रज्ञानाच्या आधारे करणे शक्य होणार आहे.

काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ना-नफा, ना-तोटा ह्या उद्देशाने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील सर्वच रुग्णांना या तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिक शस्त्रक्रिया, तपासणी आणि उपचार घेण्यासाठी अँझोरिअन तंत्रज्ञान मशीन सिद्धगिरी आरोग्यधाममध्ये आणले आहे.

अँझोरिअन तंत्रज्ञान मशीनप्रणालीच्या स्थापनाप्रसंगी मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, सुरेंद्र जैन, उदय सावंत आणि न्यरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश भरमगौडर, हृदयरोग तज्ञ डॉ. कोले, डॉ. शंतनू पालकर, डॉ. रमेश माळकर, डॉ. अभिजित शेळके, डॉ. तनिष पाटील, डॉ. अविष्कार कडव, डॉ. सौरभ भीरूड, सिद्धगिरी हॉस्पिटलमधील अधिकारी, कर्मचारी, कणेरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.