कागलच्या सविता पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार…

0
83

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या अध्यापिका सौ. सविता चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र सरपंच सेवा संघाच्या वतीने शिर्डी येथे ‘मान कर्तृत्वाचा – सन्मान नेतृत्वाचा’ या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सविता पाटील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात. शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. व्यसनमुक्ती प्रचारक म्हणूनही त्या कार्यरत आहेत, तर कोरोना काळातही त्यांनी शिक्षणात खंड पडू न देता विद्यार्थ्यांसाठी शिक्षण तसेच विविध स्पर्धा घेतल्या आहेत. तसेच आपल्या लेखनाच्या माध्यमातूनही त्या समाजजागृती करत असतात. स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचं कार्य सातत्याने करत आहेत. त्याचबरोबर समाजातील वंचित घटकांना वेळोवेळी मदतीचा हात देत असतात. त्यामुळेच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षकरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

यादवराव पावसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर ‘समाजप्रबोधन’कार निवृत्ती महाराज इंदुरीकर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे, ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, भाऊ मरगळे, विक्रम भोर, ‘हरिप्रिया शुगर’चे अध्यक्ष जयदीप वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.