कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सीपीआर रूग्णालयात नॉन कोविड रूग्णांसाठी टप्प्याटप्प्याने उपचार सुरू करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सीपीआर प्रशासनास दिल्या.

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज (सोमवार) प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधून या सूचना दिल्या. सीपीआर नॉन कोरोना रूग्णांसाठी सुरू करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोरोना रूग्णांसाठी वापरलेले वॉर्डचे निर्जंतुकीकरण करून मगच नॉन कोरोना रूग्णांवर या ठिकाणी उपचार करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.