पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करा : संभाजीराव देसाई-शिरोलीकर

0
62

चंदगड (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लालपरी (एसटी) सेवा पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांनी चंदगडचे आगारप्रमुख गाडवे यांच्याकडे आज (शनिवार) केली.

चंदगड तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे. देशासह राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चंदगड तालुक्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प होती. सध्या कोरोनाचा विचार करता त्याचा प्रादुर्भाव सध्या हळूहळू कमी होत चालला आहे. सरकारी कार्यालय, आठवडा बाजार पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने लोकांच्या अनेक शासकीय-निमशासकीय, महसूल, व्यापारी, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक आणि शेती कामासाठी तसेच आठवडा बाजार यासाठी विविध ठिकाणी प्रवास करावा लागत आहे. परंतु ग्रामीण भागात प्रवास वाहिनी समजणारी लालपरीची सेवा फक्त मोजक्याच काही मार्गांवर धावत असल्याने इतर ठिकाणच्या प्रवाशांची परवड होत आहे. तरी आगार व्यवस्थापक यांनी प्रवाशांची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेऊन इतर मार्गांची बससेवा सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव शिरोलीकर यांच्या शिष्टमंडळाने केली.

यावेळी पंकज पाटील, एडब्ल्यूएस चव्हाण, देसाई, मुल्ला, उदय देसाई, जयसिंग पाटील, महादेव मंडलिक, नामदेव नार्वेकर आदी उपस्थित होते.