फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्रास स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांची भेट 

0
36

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्र येथील सुरु असलेल्या रक्त विघटन केंद्राच्या बांधकामाची पाहणी आज (गुरुवार) स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी  केली.

स्थायी समिती सभापती सचिन पाटील यावेळी म्हणाले, फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्र येथील महानगरपालिकेच्या रक्त विघटन केंद्राच्या बांधकाम गतिमान करण्याबरोबरच या केंद्रासाठी आवश्यक उपकरणे आणि सुविधा उपलब्ध कराव्यात. या कामासाठी  तसेच कंपाउंड बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाला आहे, त्यातून रक्त विघटन केंद्रासाठी आवश्यक असलेले  साहित्यही खरेदी करण्यात यावे, अशा सूचना आरोग्यधिकारी डॉ. अशोक पोळ यांना दिल्या.

फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्र येथील रक्त  विघटन केंद्रामधून नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी हे केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी सूचना सभापती सचिन पाटील यांनी यावेळी केली. यावेळी स्थायी समिती सभापती यांनी फिरंगाई येथील कुटुंब कल्याण केंद्राच्या कामाचा आढावा घेतला. तसेच सर्व कुटुंब कल्याण केंद्राची पाहणी करुन मार्गदर्शक सूचना केल्या. ते म्हणाले, कोरोना विरुध्दच्या लढयात युध्द पातळीवर काम करतानाच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी आणि परिणामकारकरित्या जनजागृती करण्यातही पुढाकार घ्यावा.

यावेळी नगरसेविका जयश्री चव्हाण, सहा.आयुक्त संदीप घार्गे, वैद्वयकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, डॉ. विद्या भिसे, डॉ. प्रकाश गाडवे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here