एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील एसटीची वाहतूक आजपासून पूर्ण आसन क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर आगारातून आज (शुक्रवार) सकाळपासून एसटी पूर्ण आसन क्षमतेने धावण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क शिवाय एसटीमध्ये कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जात नाही.

राज्यात मार्चपासून कोरोनामुळे पूर्णपणे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर लाॅकडाऊन शिथिल झाल्यावर २० आॅगस्टपासून ५० टक्के आसन क्षमतेवर एसटी धावू लागली. त्यामध्ये एका सीटवर एकच व्यक्ती तर पूर्ण एसटी मध्ये २२ प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी होती. मात्र, नुकताच राज्यात आजपासून पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक करण्याचा निर्णय झाल्याने कोल्हापुरातून पूर्ण क्षमतेने एसटी धावू लागली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे एसटीची वाहतूक सुरळीत झाली असून एसटी महामंडळाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक फेरी दरम्यान एसटी सॅनेटायझर करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. मास्क शिवाय एसटीमध्ये प्रवेश दिला जात नाही. दरम्यान, पुन्हा एकदा कोल्हापूर आगारातून एसटी वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगर व्यवस्थापक अजय पाटील यांनी सांगितले.

Live Marathi News

Recent Posts

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेचा कॅन्सरग्रस्तांना मदतीचा हात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु…

8 hours ago