मुंबई (प्रतिनिधी) : ‘भारत बंद’ च्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने दिले आहेत. हे निर्देश एसटीच्या राज्यातील सर्व विभागांना आगारांना देण्यात आले आहेत.

एसटी च्या स्थानिक प्रशासनाने तशी माहिती घेऊन त्या-त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवायची की नाही याबाबत आढावा घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे. ज्या रस्तावर, मार्गावर आंदोलन होत आहे, अथवा होणार आहे अशा मार्गावर वाहतूक करू नये, असे एसटी महामंडळ प्रशासनाने दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एसटीची सेवाही विस्कळीत होणार आहे. बंदला सरकारनेच पाठिंबा दिल्याने कडकडीत बंद होणार आहे. परिणामी बहुतांशी मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.