मुंबई (प्रतिनिधी) :  ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सरकारला इशारा देण्यासाठी २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

यामध्ये वेतन, रखडलेली देणी आणि एसटीचे विलिनीकरण या तीन मुद्यांवर महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवशेनावेळी एसटी कर्मचाऱ्याचा मोर्चा काढण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेनं दिला आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एसटी कर्मचारी संघटनांचा संपावर जातील, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. या आंदोलनाचा पहिला भाग म्हणून २७ ऑक्टोबरला एसटी कर्मचारी राज्यभर बेमुदत उपोषण करणार आहेत.